Home नागपूर कर्ज घेण्यास लोकांची उदासीनता

कर्ज घेण्यास लोकांची उदासीनता

95 views
0
विदर्भ वतन / नागपूर : रिझर्व्ह बँकेने रेपो दरामध्ये २.५० टक्के कपात केल्यामुळे रेपो रेट ४ टक्क्यावर आला आहे. त्यामुळे बँकांनी ठेवी व कर्जावरील व्याजदरही कमी केले आहेत. असे असले तरी लोक कर्जे घेण्यास तयार नसल्याचे दिसून येते. देशातील अग्रगण्य बँका स्टेट बँक आॅफ इंडिया, पंजाब नॅशनल बँंक, बँक आॅफ महाराष्ट्र, बँक आॅफ इंडिया, कॅनरा बँक आदी बँकानी व्याज दर कमी केला आहे.
कोरोनासाठी केंद्र सरकारने २० लाख कोटीचे पॅकेज जाहीर केले त्यातील ३ लाख कोटी लघु व मध्यम उद्योगांना विनातारण कर्जासाठी राखीव ठेवले आहेत. सध्या थकीत असलेल्या खेळत्या भांडवल कर्जाच्या २० टक्के अतिरिक्त कर्ज चार वर्षांत परतफेडीच्या कराराने उद्योजकांना मिळणार आहे. पण यासाठी लोकांकडून सुध्दा मागणी नाही. सध्या गृहकर्ज घेतलेल्या ग्राहकांना ३ लाखांपर्यंत व्यक्तिगत कर्ज देण्याची योजना बँक आॅफ महाराष्ट्रने आखली आहे.