कॉंग्रेस राबविणार ‘स्पीक अप इंडिया’ अभियान

187
विदर्भ वतन / नागपूर : देशभरात सतत होत असलेल्या लॉकडाऊनमुळे आणि स्थलांतरीत मजुरांच्या घरवापसीसाठी येत असलेल्या शासकीय अडचणीमुळे सामान्यांचे जगणे कठीण झाले आहे. या अनेक समस्यांना वाचा फोडण्यासाठी सत्ताधार्यांनी पाऊन उचलावे यासाठी कॉंग्रेस आता देशभरात ‘स्पीक अप इंडिया’ हे अभियान राबवित आहे. पुढच्या सहा महिन्यांकरिता प्रत्येक गरजू कुटुंबाला दरमहा साडेसात हजार रूपये देण्यात यावे आणि १० हजार रूपये तत्काळ देण्यात यावे अशा या अभियानातुन मागण्या करण्यात येत आहे. तसेच सामान्य लोकांच्या हाताला काम मिळावे याकरिता सूक्ष्म-लघु-मध्यम उद्योग क्षेत्राला तातडीने आर्थिक मदत देण्याची मागणी देखील करण्यात येत आहे.
कोरोनामुळे उद्भवलेल्या लॉकडाऊनमुळे गरिबांना सर्वाधिक फटका बसला आहे. मजुरांना उपाशीपोटी पायपीट करावी लागत आहे. आज देशाला कर्जाची नव्हे, तर आर्थिक मदतीची गरज आहे. मनरेगाअंतर्गत दोनशे दिवस रोजगार उपलब्ध करून द्यावा, मजुरांना घरी पोहोचविण्यासाठी तात्काळ व्यवस्था करावी असे राहुल गांधी म्हणाले.