गोंदियात देशी कट्ट्यातून गोळीबार, एक जखमी  

213
राधाकिसन चुटे, जिल्हा प्रतिनिधी 
विदर्भ वतन / गोंदिया: एका इसमावर देशी कट्टने गोळी झाडून व चाकूने हल्ला करून जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची घटना नुकतीच शहर पोलीस ठाण्यांतर्गत शास्त्रीवार्ड परिसरातील मंतर चौकात घडली.
या गोळीबारात चक्रधर बोरकर हा व्यक्ती जखमी झाला असून त्याचेवर  जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. घटनेच्या दिवशी बोरकर हा दुध डेयरीजवळ बसून होता. तेथे एकाने देशीकट्ट्याने गोळ्या झाडल्या तर दुसर्या आरोपीने चाकूने हल्ला केला या हल्ल्यात बोरकर याच्या पायाला गंभीर दुखापत झाली. भरदिवसा अशा प्रकारे जीवघेणा हल्ला करण्यामागील कारण समजू शकले नसले तरी यात बाबा टायसन व विनोद यांची नावे घेतली जात आहे. नेमका प्रकार पोलीस तपासातून पुढे येणार आहे. संचारबंदी असताना असे प्रकार घडणे म्हणजे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्न निर्माण करणारे आहे अशा चर्चेला उधान आले आहे. या घटनेमुळे शहरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.