Home नागपूर सुरतहून निघालेल्या श्रमिक रेल्वेतील एक प्रवाशी कोरोना पॉझिटिव्ह

सुरतहून निघालेल्या श्रमिक रेल्वेतील एक प्रवाशी कोरोना पॉझिटिव्ह

69 views
0

विदर्भ वतन / वर्धा : सुरतमध्ये अडकलेल्या झारखंड मधील कामगारांना घेऊन निघालेल्या श्रमिक रेल्वेतील एका कामगाराची प्रकृती बिघडल्यामुळे त्याला वर्धेत उपचारासाठी उतरविण्यात आले होते. मात्र, रुग्णालायत पोहचण्याआधी वाटेतच त्याचा मृत्यू झाला. मयत व्यक्ती आणि सोबत असलेल्या नातेवाईकाची कोरोना चाचणी करण्यात आली. प्राप्त अहवालात मयत व्यक्तीची कोरोना चाचणी निगेटिव्ह तर सोबत असणार्या नातेवाईकाची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. कोरोना बाधित रुग्णाला सावंगी मेघे येथे पुढील उपचारासाठी भरती करण्यात आले असल्याचे जिल्हा शल्य चिकित्सक पुरुषोत्तम मडावी यांनी सांगितले.