‘पाताल लोक’ वर तात्काळ बंदी घाला

219
हिंदु जनजागृती समितीची मागणी
विदर्भ वतन / नागपूर : अनुष्का शर्मा प्रोडक्शन निर्मित ‘पाताल लोक’ ही वेबसिरीज पूर्णत: हिंदुविरोधी भूमिकेतून बनवण्यात आलेली आहे. त्यात अत्यंत आक्षेपार्ह दृश्ये दाखवण्यात आली आहेत. यामध्ये एका कुत्रीचे नाव ‘शावित्री’ असे ठेवण्यात आले आहे. मंदिरात पुजारी मांस शिजवून खातांना दाखवले आहेत, भगवे वस्त्र नेसलेले लोक ‘जय श्रीराम’ म्हणत गुंडगिरी करतांना दाखवले आहेत, साधू-संतांना अर्वाच्च शिवीगाळ करतांना दाखवले आहे, एका प्रसंगात एका व्यक्तीला जानवे घालून बलात्कार करताना दाखवले आहे, एक मुसलमान महिला हिंदु महिलेला पाणी देते, तेव्हा ती हिंदु महिला पाणी पिण्यास नकार देते, अशी अनेक समाजात तेढ निर्माण करणारी आणि हिंदु धर्माविषयी द्वेष पसरवणारी दृश्ये दाखवली आहेत. हे अत्यंत निषेधार्ह असून हिंदु जनजागृती समिती याचा तीव्र शब्दांत निषेध करते यासोबत ‘पाताल लोक’ या वेबसिरीजवर शासनाने तत्काळ बंदी आणावी, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते रमेश शिंदे
यांनी केली आहे.
सध्या युवापिढीला आकर्षित करणाण्यासाठी अमेझॉन, नेटफ्लिक्स, हॉटस्टार, अल्ट बालाजी यासारख्या अनेक आॅनलाइन मीडिया कंपण्या ‘पाताल लोक’ सारख्या अनेक वेबसिरीज तयार करत आहेत. यावर सेंसर बोर्डचे अंकुश नसल्यामुळे अशा कंपण्यांचे फावते आहे. त्यामुळे समाजत तेढ निर्माण होण्याचा धोका मोठ्या प्रमाणात असतो. या सर्व वेबसिरीजवर शासनाने नियंत्रण आणण्यासाठी सेंसर बोर्डसारखी व्यवस्था उभारावी अशी मागणी समितीने केली आहे.