
देशात नागपूर चौथ्या क्रमांकावर
विदर्भ वतन / नागपूर : काल शहरात ४७ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. नवतपा सुरू झाला असुन देशातील ‘हॉट’ शहरात नागपूर चौथ्या क्रमांकावर राहिले. तापमान असेच वाढत राहिले तर तापमानाचा उच्चांक मोडीत निघण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. हवामान खात्याने विदर्भात ‘रेड अलर्ट’ जारी केला आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार नागपुरात २७ मे पर्यंत तापमान ४७ अंशाहून अधिक राहण्याची शक्यता आहे. यापुर्वी नागपुरात २३ मे २०१३ या दिवशी ४७.९ अंश सेल्सिअस तापमान नोंदविण्यात आले होते. यंदा हा उच्चांक मोडीत निघणार तर नाही ना याकडे नागपुरकरांचे लक्ष लागले आहे. विदर्भातील पारा ४५ च्या वरच होता. नागपूर ४७, ब्रम्हपुरी ४५.२, वर्धा ४६, चंद्रपूर ४६.८, गडचिरोली ४३.२, अकोला ४७.४, अमरावती ४६, यवतमाळ ४५.४, गोंदिया ४५.८, वाशिम ४३.४ आणि बुलढाणा ४२.६ एकंदरीत विदर्भातील सर्व जिल्ह्यातील तापमान ४५ अंशाचा वरच होते. तापमानात अशीच वाढ राहिली तर यंदा तापमानाचे सर्व उच्चांक मोडण्याची शक्यता आहे.

