Home गोंदिया कर्जामुळे शेतकर्याची आत्महत्या

कर्जामुळे शेतकर्याची आत्महत्या

79 views
0

राधाकिसन चुटे, जिल्हा प्रतिनिधी
विदर्भ वतन /गोंदिया : कर्जबाजारी आणि कोरोनाच्या संकटाला कंटाळून शेतकर्यांने आपल्या शेतातच गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना रावणवाडी येथे सोमवार, २५ मे रोजी सकाळी ७ वाजताच्या सुमारास उघडकीस आली. श्यामलाल गराडे (वय ६०) असे कर्जबाजारी शेतकर्याचे नाव आहे. प्राप्त माहितीनुसार, श्यामलाल गराडे यांनी विविध बँकांकडून कर्ज घेतले होते. कोरोनामुळे लादण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे मिळकतीचे कोणतेच साधन नसल्यामुळे बँकांच्या कर्जाची परतफेड कशी करायची या विवंचनेत तो राहायचा. या कर्जाला कंटाळून श्यामलाल गराडे यांनी स्वत:च्या शेतात गळफास घेवून आत्महत्या केली. रावणवाडी पोलिसांनी मर्ग दाखल केला असुन पुढील तपास सुरू आहे.