सिकंदराबाद येथे उपचारासाठी गेलेला वर्धेतील रुग्ण कोरोना बाधित

253

रमाकांत मोरोने, जिल्हा प्रतिनिधी
विदर्भ वतन / वर्धा : येथील ६३ वर्षीय इसमाचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यामुळे वर्धा जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या आता चार झाली आहे. या इसमाला सिकंदराबाद येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. वर्धा जिल्ह्यात एकाच्या मृत्यूची नोंद आहे.
पॉझिटिव्ह अहवाल आलेला रूग्ण सुदामपुरी येथील असुन किडणीवरील आजाराच्या उपचारासाठी त्याला १७ मे रोजी तेलंगणातील सिकंदराबाद येथील रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथील सात दिवसाच्या उपचारानंतर ते वर्ध्याला परतणार होते. मात्र, दोन दिवसांपूर्वी त्यांची कोरोना चाचणी करण्यात आली यात त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह दर्शविण्यात आला. यामुळे ते वास्तव्यात असलेला सुदामपुरी हा सुमारे शंभर घरांचा परिसर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आला. त्यांचे संपर्कातील १७ जणांना क्वॉरंटाईन करण्यात आले आहे. तर प्रतिबंधीत सुदामपुरी येथे जीवनावश्यक वस्तुंचा पुरवाठा करण्यावर प्रशासन भर देत आहे.