जिल्ह्यात आणखी चार पॉझिटिव्ह

313
जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या ४४
राधाकिसन चुटे, जिल्हा प्रतिनिधी 
विदर्भ वतन / गोंदिया :  परराज्यात व राज्यातील काही जिल्ह्यात लॉकडाऊनमुळे अडकलेले जिल्ह्यातील कामगार, मजूर ,विद्यार्थी व नागरिक जिल्ह्यात मोठ्या संख्येने परत येत आहे.त्यामुळे  जिल्ह्यात कोरोना विषाणूच्या संसगार्चा धोका वाढला आहे. जिल्ह्यात आज ४ नवीन कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोना बधितांची संख्या ४४ इतकी झाली आहे.
  २६ मार्च रोजी आढळलेला पहिला कोरोना बाधित युवक उपचाराने बरा होऊन १० एप्रिलला घरी गेला. त्याला आज  ५२ दिवस झाले. १९ मे रोजी २ रुग्ण, २१ मे रोजी २७ रुग्ण, २२ मे रोजी १० आणि आज २४ मे रोजी नवीन ४ कोरोना बाधित रुग्ण आढळले असे एकूण ४३ रुग्ण आज जिल्ह्यात आहे.
खबरदारीचा म्हणून अनेक उपाय अवलंबविले जात आहेत.
 जिल्ह्यात आतापर्यंत ६८८ व्यक्तींच्या घशातील स्त्रावाचे नमुने विषाणू चाचणीसाठी नागपूर येथील प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहे. त्यापैकी ४४ नमुन्यांचा अहवाल सकारात्मक तर ४७८ नमुन्यांचा अहवाल नकारात्मक आला आहे. १५६ चाचणी अहवाल अद्यापही प्रलंबित आहे. आज ९४ नमुने तपासणीसाठी नागपूर येथे पाठविले आहे पैकी १० रुग्णांचे अहवाल अनिश्चित आहे.
जिल्हानिहाय स्थिती – 
जिल्ह्यातील गोंदिया येथील कोविड केअर सेंटर येथे २१० , आमगाव येथे ८,अर्जुनी मोरगाव येथे ५८, सडक अर्जुनी ७०,न् ावेगावबांध २९, गोरेगाव ११, देवरी  २ आणि सरंडी तिरोडा येथे १८ आणि डेडीकेटेड कोविड हॉस्पिटल असलेल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे ३ अशी एकूण ४०९ रुग्ण आज रात्री ८ वाजतापर्यंत भरती आहे.
शासकीय संस्थात्मक अलगीकरण केंद्र असलेल्या चांदोरी येथे १४ लईटोला येथे ५, तिरोडा  १२, उपकेंद्र बिरसी  ७, समाज कल्याण निवासी शाळा डव्वा येथे ८, जलाराम लॉन गोंदिया येथे विदेशातून आलेले ४, आदिवासी मुलांचे वसतिगृह, देवरी ७, उपकेंद्र घटेगाव ६ आणी राधाकृष्ण हायस्कुल केशोरी येथे ४२ असे एकूण १०५ व्यक्ती शासकीय संस्थात्मक केंद्रात उपचार घेत असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. हिंमत मेश्राम यांनी दिली.