Home गोंदिया लॉकडाऊनमुळे पानटपरी चालक संकटात

लॉकडाऊनमुळे पानटपरी चालक संकटात

172 views
0
आर्थिक मदतीची मागणी
संतोष रोकडे
विदर्भ वतन / अर्जुनी मोर : संपूर्ण जगातील व्यवसायाला ‘लॉक’ करणार्या कोरोनाने भारतातील पान व्यवसायायीकांच्या व्यवसायाला ‘चुना’ लागला आहे. त्यामुळे त्यांचेपुढे उदरनिर्वाहाचा प्रश्न उभा ठाकला असुन शासनाकडून आर्थीक मदतीची मागणी या पानठेला व्यावसायीकांनी केली.
महाराष्ट्राव्यतिरिक्त विदर्भातील लोकांना ‘खर्रा’चा शौक जडला असल्यामुळे खेडोपाडी बेरोजगारांनी पानठेल्यावरून खर्रासह अन्य वस्तू विक्रीकरून आपला व्यवसाय थाटलेला आहे. अनेकांची रोजगाराची समस्या या व्यवसायामुळे सुटली देखील आहे. त्यामुळे काही का होईना रोजगाराचा प्रश्न या व्यवसायामुळे मार्गी लागला आहे. लॉकडाऊनमुळे सर्वच व्यवसाय बंद पडल्यामुळे तसेच सोशल डिस्टंसिंगचे पालन करण्याचे निर्देश असल्यामुळे पान ठेल्याकरिता लागणारा माल मिळेनासा झाला आहे. त्यामुळे आपोआपच हा व्यवसायीक बेरोजगार झाला आहे. लॉकडाऊन संपेपर्यंत शासनाने कुटुंबाच्या उदरनिर्वाहाकरिता आर्थीक मदत करावी अशी मागणी गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोर तालुक्यातील या व्यावसायीकांनी केली.
तालुक्यातील ईसापूर येथील पान टपरी चालक गुलाराम हुकरे यांनी विदर्भ वतन  प्रतिनिधीला सांगितले की, कोरोना व्हायरसमुळे लॉकडाऊन करण्यात आल्याने उदरनिर्वाहाचे एकमेव साधन असलेला पान टपरी व्यवसाय बंद झाला. त्यामुळे पोट भरण्याचा प्रश्न उभा झाला असून सरकारने आम्हाला आर्थिक पॅकेज द्यावे अशी मागणी केली आहे.