Home नागपूर पाच हजार मास्क वितरीत

पाच हजार मास्क वितरीत

150 views
0

विदर्भ वतन / वाडी: कोरोराचा शिरकाव होण्यापासून बचाव व्हावा यासाठी अभिजित सोसायटी, आकांक्षा सोसायटी, मंगलधाम सोसायटी, हरि ओम सोसायटी येथील नागरिकांना समता प्रतिष्ठानच्या वतीने मोफत मास्क व त्यांचे थर्मल स्क्रिनिंग करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषद सदस्य ममता धोपटे यांची उपस्थिती होती. धोपटे यांनी या कार्यक्रमाचे कौतुक केले. इतर सामाजिक संघटना व नागरिकांनी प्रोत्साहन घेऊन असे सामाजिक कार्यक्रम राबवावे, जेणेकरून गरजूंना मदत मिळेल. वाडीत कोरोनाचे संशयित नसले तरी शासन, प्रशासनाकडून आवश्यक ती खबरदारी घेण्यात येत आहे. परिसरात घरोघरी मास्कचे वाटप करण्यात आले. यावेळी अमित हुसनापुरे, सुनील सेलोकर, रत्नाकर लोहकरे, सुबोध शर्मा, जेम्स फ्रान्सिस, वसंता धडीनकर, वासुदेव आवारे, अरूण तटे, मोहन वसूल, दिगंबर रामटेके, ताराचंद शेंडे, गुलशन शेंडे, बंटी मुटकुरे, दिगंबर रहांगडाले, शैलेश क्षीरसागर इत्यादींनी परिश्रम घेतले.