Home गोंदिया शेतकर्यांच्या बांधावर खते व बियाणांचा थेट पुरवठा

शेतकर्यांच्या बांधावर खते व बियाणांचा थेट पुरवठा

115 views
0

प्रतिनिधी, आमगाव /विदर्भ वतन : तालुका कृषी अधिकारी व कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा)आमगाव यांच्या संयुक्त विद्यमाने शेतकर्यांच्या बांधावर खते, बियाने, औषधे (कीटक नाशक, बुरशी नाशक) पुरवठा मोहिमेला तालूका कृषि अधिकारी जाधव यांच्या हस्ते आमगाव तालुक्यातील ठाणा येथील फार्मर प्रोड्युुसर कंपनी बळीराजा आणि भारत कृषि केंद्र येथुन सुरवात करण्यात आली. यावेळी कृषी पर्यवेक्षक चौधरी आत्मा यंत्रणेचे इळट सुषमा शिवणकर, राहुल सेंगर, अळट व आमगाव फार्मर प्रोड्युसर कंपनीचे अध्यक्ष भारत गोंडाणे, बाबुराव कोरे, किशोर कोरे, मनोज कोरे व कृषि निविष्ठा खरेदी करणारे गट प्रमुखांची उपस्तिथिती होती. त्यामध्ये हरितक्रांती सेंद्रीय गट ठाणाटोला व आमगाव फार्मर प्रोड्युसर कंपनीचे सभासद उपस्थिती होते.
त्यामध्ये पहिल्या दिवशी यूरिया ४० बॅग, अहिल्या बियाणे २५ बॅग, सारथी २० बॅग, जोरदार १५ बॅग शासनाच्या निर्देशाद्वारे सोशल डिस्टन्सचे पालन व एकत्रित खरेदीचे नावीण्यपूर्ण कार्याला सुरवात करण्यात येवून बियाणे, रासायनिक खते गटाला आणि कंपनीच्या सभासदांना देण्यात आले.