डिफेंस परिसरत बँक लुटण्याचा प्रयत्न

161
विदर्भ वतन / नागपूर : वाडी पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या डिफेन्स कंपनी अंबाझरी मधील स्टेट बँक इंडियाची शाखा दिनांक २० मे च्या मध्य रात्री लुटण्याच्या उद्येशाने भुरट्या चोरांनी बँकेचे गेट व हॉलचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. हा प्रकार सीसी टीव्ही मध्ये आला आहे.
बुधवारी कामकाजानंतर बँक बंद करण्यात आली. बँकच्या हॉल व प्रवेश द्वाराला कुलूप लावून त्याची चाबी मॅनेजरकडे देण्यात आली होती. दुसर्या दिवशी सकाळी कर्मचारी बँकेत आले त्यावेळी त्यांना प्रवेश द्वार व हॉलचे कुलूप तुटलेल्या अवस्थेत आढळले. ही माहिती लगेच वाडी पोलीस स्टेशनला देण्यात आली. घटनास्थळाची पाहणी करून पोलिसांनी अज्ञात आरोपीविरूध्द गुन्हा दाखल केला.  वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पाठक यांच्या मार्गदर्शनात पोलीस उप निरीक्षक अमोल काकडे तपास करीत आहेत.