नाभिक महामंडळातर्फे आॅनलाईन चित्रकला स्पर्धा

183

विदर्भ वतन / नागपूर : महाराष्ट्र नाभिक महामंडळ युवा, जिल्हा नागपुरच्या वतीने ‘आॅनलाईन चित्रकला स्पर्धा-२०२०’ चे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत कोणत्याही वयोगटातील स्पर्धक सहभागी होऊ शकतात, वयाचे बंधन नाही. ही स्पर्धा केवळ नागपूर जिल्ह्यापुरती मर्यादित आहे. चित्रकला स्पर्धेचे विषय १ – कोरोना विरोधात लढणारे ‘सुपरहिरो’, २ – लॉकडाऊन काळात नाभिक समाजाच्या समस्या आणि ३ – कोरोना काळातील सलुन दुकाणावर होणारे परिणात हे असतील. या स्पर्धेतील पहिले बक्षिस ५०१ रू. रोख, दुसरे ३०१ रोख आणि २५१ रोख रक्कम हे तिसरे बक्षिस ठेवण्यात आले आहे. स्पर्धेत भाग घेणार्यांनी रंगविलेले चित्र अमोल तळखंडे व्हॉट्सअप क्र. ७४४७३८४८४९ वर संपूर्ण नाव, पत्ता आणि आपला मोबाईल नंबर लिहून पाठवायचा आहे.