Home नागपूर दोन महिन्यात सारीची रूग्णसंख्या एक हजारावर

दोन महिन्यात सारीची रूग्णसंख्या एक हजारावर

145 views
0

विदर्भ वतन / नागपूर : कोरोना पाठोपाठ सारीच्या रूग्णसंख्येत वाढ होत असल्याने वैद्यकिय प्रशासनाची आणखीनच चिंता वाढली आहे. ११ मार्च ते १७ मे या कालावधीत विदर्भात एक हजार ५४ रूग्णांची नोंद झाली. यातील २७ रूग्णांचा मृत्यू झाला असून या रूग्णांची रोगप्रतिकार शक्ती कमी असल्यामुळे कोरोनाचा धोका अधिक असतो. सारीच्या १५ रूग्णाचंी कोविड पॉझिटिव्ह नोंद झाली आहे. ‘सारी’ या आजारात रूग्णाला तीव्र श्वसनाचे विकार होतात. यात दमा, खोकला आणि इतर श्वसनाचे विकार जडतात. सारी आणि कोरोना यांच्या लक्षणात साम्य असते. सारीच्या रूग्णाची रोगप्रतिकार शक्ती कमी असल्याने कोरोना होण्याचा धोका अधिक संभावतो. त्यामुळेच रूग्ण दगावण्याचे प्रमाण वाढते आहे. या कारणांमुळेच प्रशासन अशा रूग्णांवर बारकाईन लक्ष ठेवून आहेत. विदर्भात रोज १५ ते २० सारीचे रूग्ण आढळून येतात. ही संख्या कोरोना रूग्णांपेक्षा मोठी आहे. विदर्भात आतापर्यंत भंडारा जिल्ह्यात १२९, चंद्रपूर ११६, गडचिरोली ४४, गोंदिया २६, नागपूर ग्रामीण १३, नागपूर शहर ४९४, वर्धा ९१, अकोला २३, अमरावती ४६, बुलडाणा ११, वाशिम ११ तर यवतमाळ जिल्ह्यात ५० रूग्णांची नोंद झाली.