Home गोंदिया आमगाव तालुका काँग्रेसच्या वतीने राजीव गांधी यांना आदरांजली

आमगाव तालुका काँग्रेसच्या वतीने राजीव गांधी यांना आदरांजली

130 views
0

प्रतिनिधी
विदर्भ वतन / आमगाव : भारताचे माजी पंतप्रधान स्व. राजीव गांधी यांची पुण्यतिथी काँग्रेस जनसंपर्क कार्यालयात आयोजित करण्यात आली. प्रसंगी काँग्रेस पदाधिकारी उपस्थितीत होते. राजीव गांधी यांच्या प्रतिमेस पुष्पांजली अर्पण करण्यात आली. यावेळी उपस्थितांनी आपले मनोगत व्यक्त केले. राष्ट्रीय कॉंगे्रस पक्षाचे कार्य तळागळातील जनतेपर्यंत पोहचविणे हीच खरी त्यांना आदरांजली ठरेल अशा भावना उपस्थितांनी मांडल्या. बंशीधर अग्रवाल, संपत सोनी, संजय बहेकार, प.स. सदस्या छबू उके, प्रभा उपराडे, महेश उके, हुकुम बहेकार, राजकुमार फुंडे, रामकीसन शिवणकर, अजय खेतांन, संदिप टेंभुर्णीकर, हंसराज जोशी आदींची उपस्थिती उपस्थिती होती.