एसडीपीओंनी केली करांडली गावाची पाहणी

212

संतोष रोकडे

विदर्भ वतन / अर्जुनी-मोर : उपविभागीय पोलिस अधिकारी प्रशांत ढोले यांनी कंटेंटमेंट झोन असलेल्या करांडली या गावाला भेट देऊन तेथील परिस्थितीचा आढावा घेतला. सुरक्षीततेच्या दृष्टीकोणातुन गाव परिसरात आधीच नाकाबंदी करण्यात आली आहे. कोरोनाचा फैलाव होणार नाही याची सर्वतोपरी खबरदारी घ्यावी आवश्यकता भासल्यास प्रशासन आपल्या मदतीला असल्याचे गावातील आपातकालीन व्यवस्थापन समिती आणि ग्रामपंचायतीमधील कर्मचार्यांना एसडीपीओ म्हणाले. तसेच गावातील प्रत्येकांनी आपली स्वत:ची काळजी घ्यावी असे आवाहन देखील त्यांनी केले.