विदर्भ वतन / नागपूर : भारतरत्न स्व. राजीव गांधी यांच्या आज २९ व्या पुण्यतिथी निमित्त दक्षिण नागपूर कॉंग्रेस कमिटीच्या वतीन अभिवादन करण्यात आले. राज्य कॉंग्रेस कमिटीचे सचिव गिरीश पांडव यांनी त्यांच्या प्रतिमेला माल्यार्पन केले. कमिटीच्या पदाधिकार्यांनी स्व. राजीव गांधी यांच्या जीवनावर प्रकाश टाकून आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमांती उपस्थितांनी मौन धारण करून त्यांना श्रध्दांजली अर्पण केली. या कार्यक्रमाला नगरसेवक मनोज गावंडे, दिनेश तारळे, विश्वेश्वर अहिरकर, सुहास नानवटकर, अरविंद क्षीरसागर, परमेश्वर राऊत, अमोल धरमारे, सुशांत लोखंडे, वसंता लुटे, अक्षय हेटे, शुभम तल्हार, प्रवीण गवरे, किशोर गीत, प्रमोद सोरते आदींची उपस्थिती होती.

Leave a Reply

Your email address will not be published.

You missed