प्रणयात आड आलेल्या मालकालाचा सांडाने घेता जीव

186
संतोष रोकडे
विदर्भ वतन / अर्जुनी-मोर : अगदी लहानपणा पासून पोटच्या मुलासारखा सांभाळ करून वाढविलेल्या वळूने (सांड) प्रणयात आड आल्यामुळे आपल्याच मालकावर हल्ला चढविला. सांड एकढा चिथावलेला होता की, हा आपला अन्नदाता आहे हे विसरूनच गेला. या भयंकर हल्ल्यात मात्र, दुर्दैवी मालकाने आपला जीव गमावला.
अर्जुनी मोर तालुक्यातील ईटखेडा या गावातील ही हृदयविदारक घटना दिनांक १९ मे रोजी घडली. रामदास सदाशिव राजगडे (वय ५५) असे या वळूच्या मालकाचे नाव. रामदास यांच्या घरच्या गाईला जन्मलेला हा बछडा विलक्षण असल्यामुळे तो मोठा झाल्यावर गाई फळविण्यासाठी त्याचा उपयोग होईल आणि त्यातून चार पैशाची मिळत देखील होईल. या हेतून रामदासने बछड्यास सर्वतोपरी काळजी घेवून मोठे केले. सामोर त्याचा त्या कामासाठी उपयोगही होऊ लागला. मात्र, १९ मे हा दिवस या शेतकर्यासाठी कर्दनकाळ ठरला. वळू प्रणयाच्या धुंदीत असताना मालकाचा व्यत्यय होत असल्याचे पाहून वळूने रामदासला लक्ष्य करत त्याचेवर हल्ला चढविला. अनपेक्षीत झालेल्या हल्ल्यात बेसावध असलेला रामदास गंभीर जखमी झाला. उपचारासाठी त्याला अर्जुनी-मोर ग्रामीण रूग्णालयतून ब्रम्हपुरी आणि त्यानंतर नागपुरला दाखल करण्यात आले. अखेर उपचारादरम्यान २० रोजी रामदासची प्राणज्योत मावळली.