राजोली भरनोली परिसरात नक्षल्यांनी लावले बॅनर-पोस्टर

193

एटापल्ली घटनेचा निषेध म्हणून केले बंदचे आवाहन

संतोष रोकडे
विदर्भ वतन / अर्जुनी-मोर : गडचिरोली जिल्ह्यातील एटापल्ली येथील प्रकरणाचा निषेध म्हणून आज सायगाव तुकूम आणि बोरटोला तीरखुरी मार्गावर नक्षल्यांनी बॅरन, पोस्टर लावून बंद पाळण्याचे आवाहन केले. तालुक्यातील शेवटच्या टोकावर असलेल्या राजोली भरनोली परिसरातील ही गावे आहेत. गावकर्यांना आज पहाटे नक्षल्यांनी लावलेली बॅनर व पोस्टर्स दिसून आली, ज्यात आज २० मे रोजी बंद पाळण्याचे आवाहन केले होते. गडचिरोली डिव्हिजन दलमच्या वतीने ही बॅनर लावले असल्याचा निष्कर्ष काढण्यात आला. आधीच देशभरात कोरोनाच्या दहशतीमुळे लॉकडाऊन काटेकोरपणे पाळावा लागत आहे. यामुळे ग्रामीण भागातला रोजगार हिरावला गेला आहे अशात नक्षल्यांनी बंदचे आवाहन केल्यामुळे नागरिक धास्तावलेले आहेत. आज पहाटेपासूनच या मार्गावर शुकशुकाट पसरला होता.