Home नागपूर झोपडपट्टीतील बालकांना कपडे वाटप

झोपडपट्टीतील बालकांना कपडे वाटप

212 views
0

ज्योती व्दिवेदी यांचा पुढाकार

विदर्भ वतन / नागपूर : लॉकडाऊनच्या काळात हातावर पोट असलेल्या झोपडपट्टीत मजूरवर्गाची दोन वेळ पोटाची भूक भागविण्यासाठी वणवण सुरू आहे. या परिस्थितीत त्यांच्या मुलाबाळांसाठी नवे कोरे कपडे विकत घेणे म्हणजे त्यांच्यासाठी एक दिवा स्वप्न ठरते आहे. अशा वेळी ओमकार नगर रिंग रोड, घोगली आणि बेसा परिसरातील झोपडपट्टीत वास्तव्यात असलेल्या मोलमजुरांच्या मुलांसाठी ‘आदर्श बहुउद्देशीय शिक्षण संस्थे’च्या ज्योती व्दिवेदी यांच्या वतीने कपडे वाटप करण्यात आले.

कपडे वितरणप्रसंगी या मुलांचे सॅनिटाईजने हात साफ करून त्यांना दिवसातून साबनाने हात धुण्यासंबंधी जागृत करण्यात आले. लॉकडाऊन काळापासून या संस्थेच्या वतीने निशुल्क भोजन, किराणा किट्स, मास्क आणि सॅनिटाईजरचे सातत्याने वितरण केल्या जात आहे. तसेच लॉकडाऊन असेपर्यंत हा उपक्रम सुरू ठेवण्यात येणार असुन संस्था गरिब मुलांना मोफत शिक्षण देत असल्याचे संस्थेच्या संचालक ज्योती व्दिवेदी यांनी सांगीतले. या उपक्रमात मीना तिवारी यांनी योगदान दिले.