गुमथळा येथे कापूस खरेदी केंद्राचे उद्घाटन

228
हुकुमचंद आमधरे यांच्या प्रयत्नांना यश
गजानन बोरकर
विदर्भ वतन / कामठी : आज गुमथळा येथे शासकीय कापूस खरेदी केंद्राचा उद्घाटन सोहळा राज्यमंत्री सुनिल केदार यांचे हस्ते पार पडला. या प्रसंगी खासदार कृपाल तुमाने यांनी प्रामुख्याने उपस्थिती होती. लॉकडाऊनमुळे कापूस खरेदी केंद्रे बंद ठेवण्यात आली होती, त्यामुळे आधीच आर्थिक अडचणीत सापडलेल्या शेतकर्यांच्या चिंतेत भर पडली. विक्रीसाठी साठवून ठेवण्यात आलेला कापूस शेतकर्यांच्या घरातच पडून होता. कापूस केंद्र सुरू करण्यासाठी कामठी बाजार समिती सभापती तथा मुंबई बाजार समितीचे संचालक हुकूमचंद आमधरे यांनी अथक परिश्रम घेतले. अखेर त्यांच्या परिश्रमाला यश आल्याने आज गुमथळा येथे  कापूस केंद्र सुरू झाले. यामुळे शेतकर्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
जिथे शेतकरी अडचणीत येईल तेथे महाविकास आघाडी सरकारच्या वतीने त्यांना मदत केली जाईल असे खा. तुमाने म्हणाले. उद्घाटन सोहळ्याप्रसंगी कापूस विक्रीसाठी घेवून आलेल्या शेतकर्यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. प्रसंगी आमदार टेकचंद सावरकर, माजी जि. प. अध्यक्ष सुरेश भोयर, अवंतिका लेकुरवाळे, अनिल निधान, उमेश रड़के, गोपाल तेलमासरे, अंबर वाघ, नाना मांडलिक, दिनेश ढोले, श्रीणू यांगटी, वानखेड़े, राजेन्द्र लांडे, मनोहर कोरडे, नाना वाघ, अशोक चिखले, अजय कडू ,मेश्राम तसेच गुमथळा येथील सरपंच- उपसरपंच आणि इतर मान्यवर उपस्थित होते.