Home नागपूर वाडी नगरपरिषदेवर प्रशासकाची नेमणूक

वाडी नगरपरिषदेवर प्रशासकाची नेमणूक

75 views
0
विदर्भ वतन / वाडी :  नगरपरिषदेची मुदत मंगळवार दिनांक १९ मे २०२० रोजी संपलेली आहे. नव्याने निवडणूक घेण्यात लॉकडाऊनच्या नियम व अटी आड येत असल्यामुळे वाडी नगर परिषदेवर प्रशासक नियुक्त करण्याचा निर्णय घेण्यात आला.
नागपूर ग्रामीणच्या उपविभागीय अधिकारी इंदिरा चौधरी यांच्याकडे वाडी नगरपरिषदेच्या प्रशासक पदाचा कार्यभार सोपविण्यात येत आहे. त्या आज बुधवार दि. २० ला कार्यभार स्वीकारतील. वाडी नगरपरिषदेत एप्रिल महिन्यामध्ये निवडणूक होणार होती. पण राज्यात कोरोना बाधितांची संख्या सतत वाढत असल्यामुळे आणि संचारबंदी लागू असल्याने निवडणूक रद्द करण्यात आली.