गोंदियात मिळाले आणखी दोन कोरोनाबाधित रूग्ण 

205
ग्रीन झोन गोंदिया परत आॅरेंज झोनमध्ये 
विदर्भ वतन /गोंदिया: जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव आणि आमगाव तालुक्यात कोरोनाबाधीत रूग्ण आढळल्याने गेल्या ३८ दिवसांपासून ग्रीन झोनमध्ये असलेला गोंदिया जिल्हा आता परत आॅरेंज झोनमध्ये टाकण्यात आलेला आहे. गोंदियात पॉझिटिव्ह निघालेला युवक करोनामुक्त झाल्यानंतर जिल्हा ग्रीन झोनमध्ये आला होता. या गावातील दोन्ही व्यक्तींचा अहवाल पॉझिटिव्ह  आला आहे. सदर दोन्ही व्यक्तींना  क्वारंटाईन करण्यात आले.
अर्जुनी मोरगाव तालुक्यातील व्यक्ती हा मुंबईतील दहिसर येथून ट्रकने गडचिरोली जिल्ह्यातील मजूरांसोबत आला होता. गडचिरोली जिल्ह्यातील कुरखेडा येथील मजूर कोरोना पॉझिटिव्ह आढळून आला. त्यांच्यासोबत तो ट्रकमध्ये आल्याने त्याला कोरोनाचा संसर्ग झाल्याची माहिती असून मुंबईवरून आलेल्या सर्व ५२ मजूरांना प्रशासनाने क्वारंटटाईन  केले आहे. जिल्हा प्रशासन गोंदियाला ग्रीन झोनमध्ये ठेवण्यासाठी अथक परिश्रम घेत असताना हे दोघे पॉझिटीव्ह आढळल्याने जिल्ह्यात खळबळ माजली आहे. प्रशासनाकडून हे दोन्ही गाव  कंटेनमेंट झोन म्हणून जाहीर करण्यात आले.