सेवार्थ बहुउद्देशिय संस्थेकडून वंचितांना मदतीचा हात

236

विदर्भ वतन / नागपूर : लॉकडाऊनमुळे रोजगार बंद पडल्यामुळे मजुरांना हालअपेष्टा सहन कराव्या लागत आहे. त्याच्यापुढे उदरनिर्वाहाचा प्रश्न आवासून उभा आहे. अशा मजुरांना सेवाभावी संस्थांनी मदतीचा हात पुढे केला आहे. असाच उपक्रम सेवार्थ बहुउद्देशिय जनसेवा संस्थेने सुरू केला आहे. या संस्थेच्या वतीने पोलिस कर्मचार्यांना मास्क, सॅनिटायझर, पाणीच्या बॉटल्स आणि नास्त्याची व्यवस्था केली. पाचपावली, बेसा, बेलतरोडी इत्यादी परिसरातील मजूर आणि गरजवंत तसेच रेशन दुकानातून मिळणार्या धान्यापासून वंचीत असलेल्या गोरगरीबांना जीवनावश्यक वस्तू आणि धान्य वाटप करण्यात आले. या संस्थेच्यावतीने लॉकडाऊन संपेपर्यंत गरजुंना अशीच मदत केली जाणार असल्याचे संस्थेचे अंकित वैद्य यांनी सांगीतले. राहुल, लोकेश बिजवे, बलराम वर्से, आलोक रसाळ, दिलीप मेहकरकर, महेंद्र रामबन्सी, अश्विनी लोणारे, रंजना भानारकर आदी योगदान देत आहेत.