आमगाव येथील पत्रकारांची कोरोना चाचणी 

178
प्रतिबंधात्मक औषधाचे वितरण
राहूल चुटे, तालुका प्रतिनिधी 
विदर्भ वतन /आमगाव: देशात कोरोना-१९ या संसर्ग रोगाने थैमान घातले आहे. त्यापासून बचाव करण्यासाठी लॉकडाऊन हा एकमेव पर्याय पुढे असतांना तो संसर्ग अधीक पसरू नये म्हणून अनेक संघटना मदतीला पुढे आल्या आहेत. पोलीस, आरोग्य विभागासोबतच पत्रकार संघटना सुद्धा यात आपले योगदान देत आहेत. या पत्रकारांना आजाराची लागण होऊ नये म्हणून त्यांची तपासणी व प्रतिबंधात्मक औषधांचे वितरण गोंदिया होमिओपॅथिक मेडीकल कॉलेज व हॉस्पिटल, गोंदियाच्या वतीने करण्यात आले.
या कॉलेजच्या प्राचार्या डॉ. हर्षा कानतोंडे यांच्या मार्गदर्शनात डॉ. रोशन कानतोंडे, डॉ. नेहल कुंभलकर, डॉ. शिवानी विभूते, डॉ. साक्षी तिवारी, डॉ. रिचा कोडवानी, डॉ. रूचिता जगवानी या चमूने पोलीस स्टेशन आमगाव येथे १७ मे रोजी पत्रकार संघाचे अध्यक्ष इसूलाल भालेकर, उपाध्यक्ष झेड. एस. बोरकर, सचीव राधाकिसन चुटे, कोषाध्यक्ष सुनिल क्षिरसागर, अजय खेतान, सुनिल पडोळे, रितेश अग्रवाल, नरेंद्र कावळे, राजू फूंडे, दिनेश शेंडे, आनंद शर्मा, विकास शर्मा, रेखलाल टेंभरे, महेश मेश्राम यांची चाचणी केली व प्रतिबंधात्मक होमिओपॅथीक औषधीचे वितरण केले तसेच या ससंर्गापासून बचावात्मक उपायावर आवश्यक सूचना दिल्या.