Home गोंदिया गोंदिया जिल्हा ३७ दिवसांपासून ग्रीनच,१० अहवाल प्रलंबित

गोंदिया जिल्हा ३७ दिवसांपासून ग्रीनच,१० अहवाल प्रलंबित

0
४९ व्यक्ती विलगीकरणात तर ५७ अलगीकरण केंद्रात
राधाकिसन चुटे, जिल्हा प्रतिनिधी  
विदर्भ वतन / गोंदिया :  कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यात जिल्ह्यात यश आले असून ३७ दिवसाच्या कालावधीत जिल्ह्यात एकही नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळून न आल्याने जिल्हा आजही ग्रीन झोनमध्ये कायम राहिला आहे.  १७ मे रोजी नागपूर येथील विषाणू चाचणी प्रयोगशाळेत ४ व्यक्तीच्या घशातील स्त्रावाचे नमुने पाठविण्यात आले आहे. एकूण १० नमुन्यांचा चाचणी अहवाल अप्राप्त आहे. मात्र शासकीय कार्यालयात नागपूर व भंडारा येथून अपडाऊन करणार्या कर्मचार्यामुळे जिल्ह्यात संसर्ग पसरू शकतो. या प्रकाराकडे जिल्हापरिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी व जिल्हाधिकारी यांनी डोळेझाक केल्याचे दिसून येते.
आतापर्यंत जिल्ह्यातील एकूण ३६७ व्यकतींच्या घशातील स्त्रावाचे नमुने कोरोना चाचणीसाठी नागपूर येथील विषाणू चाचणी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले. त्यापैकी ३५७ व्यक्तीच्या घशातील स्त्रावांच्या नमुन्याचा चाचणी अहवाल प्राप्त झाला आहे. यामध्ये ३५६ नमुन्यांचा चाचणी अहवाल नकारात्मक तर १ नमुना यापूर्वीच सकारात्मक आला होता. १० नमुन्यांचा अहवाल प्रलंबित आहे.
एक युवक २६ मार्चला जिल्ह्यात कोरोना बाधित आढळून आला होता. त्या युवकावर उपचार करण्यात आले. त्याचा विषाणू चाचणी अहवाल १० एप्रिल रोजी नकारात्मक आल्यामुळे तो बरा झाल्याने त्याला जिल्हा सामान्य रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली. जिल्ह्यात कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी जिल्हा प्रशासन, आरोग्य विभाग व पोलीस विभागासह अन्य विभाग दिवसरात्र परिश्रम घेत असल्यामुळे जिल्ह्यात कोरोना विषाणूचा प्रसार झालेला नाही.
जिल्ह्यातील सात शासकीय संस्थात्मक अलगीकरण केंद्रात ५७ व्यक्ती उपचार घेत आहे. गोंदिया येथील नवीन जिल्हा क्रीडा संकुल आणि आमगाव येथील भवभूती महाविद्यालय येथे तयार करण्यात कोविड केअर सेंटरमधील विलगिकरण कक्षात अनुक्रमे ४८ आणि १ असे ४९ व्यक्ती उपचार घेत आहे. शासकीय संस्थात्मक अलगीकरण केंद्र असलेल्या चांदोरी  ४, लईटोला ५, लिटिल बर्ड कॉन्व्हेंट, नगर परिषद तिरोडा ४ , उपकेंद्र बिरसी  ७, शासकीय आदिवासी आश्रमशाळा इळदा २६, समाजकल्याण निवासी शाळा, डव्वा  ७ आणि जलराम लॉन, गोंदिया येथे विदेशातून आलेले ४ असे एकूण ५७ व्यक्तीं या सात शासकीय संस्थांत्मक अलगीकरण केंद्रात उपचार घेत आहे. विलगिकरण केंद्रातील ४९ आणि संस्थात्मक अलगीकरण केंद्रातील ५७ असे एकूण १०६ व्यक्ती उपचार घेत आहे.
नागरिकांना कोरोनाबाबत काही माहिती जाणून घ्यावयाची असल्यास किंवा त्यांना सल्ला हवा असल्यास हेल्पलाईन क्रमांक ८३०८८१६६६६ आणि ८३०८८२६६६६ यावर संपर्क साधण्याचे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. हिंमतराव मेश्राम यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here