Home नागपूर पीएम केअर फंडाची माहिती सार्वजनीक करण्यास युक्तीवाद

पीएम केअर फंडाची माहिती सार्वजनीक करण्यास युक्तीवाद

210 views
0
विदर्भ वतन / नागपूर : देशभरात कोविड-१९ च्या संसर्गामुळे लॉकडाऊन सुरू आहे. त्यामुळे बहुतांश लोक घरातच आहेत त्यांच्या पोटापाण्याचा प्रश्न सोडविण्याकरिता केंद्र व राज्य शासनाने काही उपाय सुरू केले असून त्याकरिता देशा-विदेशातील दानदात्यांनी ‘पीएम केअर फंडात’ कोट्यवधी रूपयाची रक्कम दान म्हणून दिली आहे. नेमके या रकमेचे काय होत आहे, याची माहिती घेण्याकरीता शहरातील अ‍ॅड. अरविंद वाघमारे यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल करून हिशोब सार्वजनिक करण्याची विनंती केली होती. यावर ही याचिका प्रसिध्दी मिळविण्यासाठी केली आहे असे आरोप केंद्र शासनाने केला.
याचिकेवर न्यायमूर्ती अमित बोरकर यांच्यासमक्ष सुनावणी झाली. यात केंद्र सरकारने आपली बाजू मांडतांना याचिकेवर अनेक आक्षेप घेतले. याचिकाकर्त्यांनी याचिकेमध्ये एकही अंतरिम आदेशाची मागणी केली नाही याकडे लक्ष वेधले. ही बाब लक्षात घेता याचिकाकर्त्याला अंतरिम आदेशाच्या मागणीसंदर्भात १९ मे पर्यंत अर्ज सादर करण्याचे निर्देश देऊन सुनावणी तहकूब करण्यात आली. कोरोना संक्रमणाविरूध्द लढण्यासाठी तसेच प्रभावित नागरिकांना सहकार्य करण्यासाठी २८ मार्च रोजी या फंडची स्थापना करण्यात आली होती. या फंडमध्ये आतापर्यंत किती रक्कम जमा झाली, फंडमधील जमा-खर्चाचे कॅगमार्फत आॅडिट करण्यात यावे, फंडच्या विश्वस्त मंडळातील तीन पदे तातडीने भरण्यात यावीत आणि या तीनपैकी दोन विश्वस्त देशातील प्रमुख विरोधी पक्षांमधुन नियुक्त करावे असे याचिकाकर्त्याचे म्हणणे होते.