रविवारी स्वगृही परतले ५०६ कामगार

193

विदर्भ वतन / नागपूर : लॉकडाऊनमुळे जागोजागी अडकलेल्या कामगारांसाठी एसटी महामंडळातर्फे बससेवेची व्यवस्था सुरू करण्यात आली होती. या बसेस या मजूरांना त्याच्या प्रदेशातील सीमेवर सोडून देत होत्या. ही सेवा काही दिवसांकरीताच असल्याने रविवार हा अंतिम फेरीचा दिवस होता. या दिवशी एकूण ५०६ कामगारांना स्वगृही पाठविण्यात आले. महामंडळाच्या २३ बसेसच्या माध्यमातून त्यांना मध्यप्रदेश आणि छत्तीसगड सीमेवर सोडण्यात आले. लॉकडाऊनमुळे एसटी महामंडळाच्या सेवा बंद ठेवण्यात आल्या होत्या. अडकलेल्या कामगारांची समस्या लक्षात घेता महाराष्ट्र शासनाच्या आदेशावरून एसटीने विविध ठिकाणी अडकलेल्या कामगारांना त्यांच्या घरी सोडण्यासाठी वाहतूक सुरू केली होती. त्यानुसार १७ मे हा या सेवेचा अंतीम दिवस होता. गणेशपेठ स्थानकावरून रविवारी २३ बसेस सोडण्यात आल्या. यातील प्रवाशी ५०६ मजुरांना मध्यप्रदेशातील बागनदी आणि छत्तीसगडच्या खवासा सीमेपर्यंत सोडण्यात आले. या फेरीसोबतच कामगारांना सोडण्याची ही मोहिम थांबविण्यात आली आहे.