लॉकडाऊनचा चौथा टप्पा राहणार ३१ मे पर्यंत

186
अनेक आस्थापनात शिथील
विदर्भ वतन / नागपूर : कोविड-१९ या जागतीक आजारावर उपाय म्हणून आजवर कोणतीही लस विकसीत करण्याला यश आले नसल्यामुळे कोरोनाबाधीत देशांमध्ये लॉकडाऊन हाच उपाय योजला आहे. आपल्या देशात हा लॉकडाऊन मार्च महिन्यापासून टप्प्या-टप्प्याने सुरू करण्यात आला होता. यातील तीसर्या टप्प्यातही रूग्णसंख्या आटोक्यात आली नसल्यामुळे आज (१८ मे) पासून चौथ्या लॉकडाऊनची घोषणा केंद्रीय पातळीवर करण्यात आली आहे.  या टप्प्याचा कालावधी  ३१ मे पर्यंत असल्याचे जाहिर करण्यात आले.
लोक घरात कोंबल्यागेल्याने केंद्र व राज्य शासनाने नियोजन करून अनेक आस्थापने सुरू करण्यास परवानगी दिली आहे. देशात कोरोनाग्रस्तांना आकडा हा महाराष्ट्रात सर्वाधिक आहे व तो दिवसागणीक वाढतच आहे, ही शासनापुढे आव्हानाची बाब ठरत आहे. असे असले तरी प्रत्येक जिल्ह्याला कोरोनाच्या स्थितीनुसार रेड, ग्रीन आणि आॅरेंज विभाग ठरविण्याचा अधिकार केंद्राने राज्यांना दिला आहे. प्रतिबंधित भागातील दुकाने आजपासून वेगवेगळ्या वेळेत चालू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. या सर्व दुकानांनी एकावेळी पाचपेक्षा अधिक लोकांना एकत्र येऊ देवू नये तसेच ग्राहकांदरम्यान सहा फूटाचे अंतर राखले पाहिजे, सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना मालगाड्यांची वाहतूक सुरू करण्याची परवानगी देण्यात आली आहे. आरोग्य, पोलीस, सरकारी कार्यालये तसेच आरोग्य कर्मचार्यासाठीची आदरातित्थ्य सेवा सुरू करण्यात येत आहे. परस्परांच्या संमतीने आंतरराज्य प्रवासी बस, वाहतूक सुरू करण्यासही मुभा देण्यात आली. खेळाडूंसाठी क्रीडा संकुले आणि स्टेडियम खुले करण्यात येत आहे, मात्र प्रेक्षकांना बंदी असेल, ६५ वर्षांपेक्षा अधिक वयाच्या व्यक्ती, गंभीर असलेले लोक, गर्भवती महिला आणि दहा वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना घराबाहेर जाण्यास बंदी असेल, घरपोच अन्नपदार्थ पोहोचविणार्या रेस्टॉरंटला किचनपुरती मुभा देण्यात आली तर बस स्थानके, रेल्वेस्टेशन आणि विमानसेवा येथील उपहारगृहे सुरू राहतील. घोषीत करण्यात आलेल्या चौथ्या लॉकडाऊनमध्ये या सेवांना खुले करण्यात आले असून देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय हवाई प्रवास, अत्यावश्यक सेवा वगळता लोकांना सायंकाळी ७ ते सकाळी ७ या वेळेत संचारबंदी, शाळा, कॉलेज, शैक्षणिक, प्रशिक्षण, कोचिंग संस्था, सर्व धार्मिक स्थळे, प्रार्थनागृहे, हॉटेल्स, रेस्टॉरंट, चित्रपटगृह, नाट्यगृह, प्रेक्षागृह, शॉपिंग मॉल्स, जिम्नशियम, तरणतलाव, मनोरंजन पार्क, बार, सभागृहे, सर्व सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक, धार्मिक, मनोरंजक यावर बंदी कायम ठेवण्यात आली आहे.