Home नागपूर रेशन दुकानदारांच्या मुजोरीला आळा घाला – सिध्देश्वर कोमजवार

रेशन दुकानदारांच्या मुजोरीला आळा घाला – सिध्देश्वर कोमजवार

160 views
0
कार्डवरील धान्यात केली जाते मोठी कपात
विदर्भ वतन / नागपूर : लॉकडाऊनला ५० दिवसांचा कालावधी लोटून गेला आहे. अजुनही लॉकडाऊन सुरूच आहे. मजुरांना काम नसल्यामुळे त्यांची अन्नधान्यासाठी भटकंती सुरू आहे. यांचा उदरनिर्वाह व्हावा याकरिता शासनाने रेशन दुकानाच्या माध्यमातून रेशन वितरण करने सुरू केले आहे. हे मोफत रेशन मिळावे याकरिता हे असह्य मजूर रेशन दुकानांपूढे सकाळी ६ वाजल्यापासून रांगेत उभे असतात.
शासनाच्या या धोरणाला दस्तुरखूद रेशन दुकान चालकांनीच सुरूंग लावणेन सुरू केले आले आहे. याचे अनेक प्रकार या कालावधीत सामोर येत आहेत. एका सामाजिक कार्यकर्त्यानंतर रेशन वितरण संबंधी धोरणाबाबत जनहित याचीका देखील दाखल केली होती. रेशन दुकानातील काळ्याबाजाराचे अनेक प्रकार दक्षिण नागपूर परिसरात नित्यनेमाने घडत असतात. रेशन कार्डवर कौटूंबीक सदस्यांचे नाव जास्त असले तरी दोन ते तीनच लोकांपूरते धान्य दिल्या जाते. हा प्रकार सर्वच सरकारी धान्य दुकानात सुरू आहे. दक्षिण नागपूरातील बनोदे या दुकानदाराने स्वत:च्या हातानी ग्राहकाच्या रेशनकार्डवर खोडतोड केली. या रेशनकार्डवरील इतर नाव खोडून दोनच लोकांची नावे ठेवण्यात आली.  म्हणजेच कुटुंबात जर सहा लोक असतील तर या खोडतोडीमुळे फक्त दोन लोकांपुरते धान्य द्यायचे आणि उर्वरित चार लोकांच्या नावाने आलेले धान्य गडप करायचे असे प्रकार अनेक ठिकाणी होत आहे. दक्षिण नागपुरातील सर्व रेशन दुकानाची चौकशी केल्यास जवळपास सर्वच दुकानात सर्रास हे प्रकार सुरू असल्याचे निदर्शनात येईल. या दुकानदारांवर कारवाई व्हावी अशी मागणी शिवसेनेचे शाखा प्रमुख सिध्देश्वर कोमजवार यांनी निवेदनातून अन्नपूरवठा नागरीक अधिकारी यांचेकडे केली. यावेळी प्रविण देशमुख, दिपक पोहणेकर, अक्षय वाकडे आदी उपस्थित होते.
                             दिनांक १३ रोजी अन्न धान्य वितरण अधिकारी अनिल सवई यांना सिध्दु कोमजवार यांच्या नेतृत्वाखाली निवेदन देण्यात आले. दक्षिण नागपूर मधील स्वत अन्न धान्य दुकानदार घोळ करीत आहे. ज्या राशन कार्ड वर ४ लोकांची नाव आहे त्यात ३ लोकांचेच ध्यान देण्यात येते. रेशन दुकानदारांकडून ग्राहकांना असभ्य भाषेचा वापर केला जातो. रोज सकाळी ६ वाजेपासून रांगेत उभे राहून ग्राहक जेव्हा काऊंटर जवळ येतो, तेव्हा त्यांना आजचे वाटप संपले उद्या या, असे सांगूना त्यांना आल्यापावली परत पाठविले जाते. एका दुकानदाराने तर चक्क राशन कार्डवर स्व:ताच्या हाताने नावच खोडले. अशा प्रकारे सरकारी स्वस्त धान्य दुकानदार गोरं गरीब जनतेला त्रास देत आहे.