Home गोंदिया शहरात आलेल्या काळविटाचा मृत्यू

शहरात आलेल्या काळविटाचा मृत्यू

73 views
0
राधाकिसन चुटे
विदर्भ वतन / गोंदिया : लॉकडाऊनमुळे शहरी भागात तसेच जंगलव्याप्त भागात मानवी हस्तक्षेप कमी झाल्यामुळे वन्यप्राण्यांना शहराच्या दिशेने वाटचाल सुरू केली आहे. सकाळी ११ च्या सुमारास गोंदिया शहरातील गणेश नगर परिसरात असेच चित्र पहावयास मिळले. या ठिकाणी काळवीट मुक्त संचार करीत दिसले मात्र या मुक्त संचारात त्याला आपला जीव देखील गमवावा लागला, गोंदिया शहरालगत  असलेल्या माळरानात मोठ्या संख्येने काळवीट आहेत. मात्र ते आपला परिसर ओलांडून कधीच येत नाही.
  गोंदिया शहरातील गणेश नगर या परिसरात अचानक काळवीट धावतांना दिसला कुठेही न थांबत तो त्या परिसरात धावत होता मात्र, त्याला धावतांना अंदाज आला नसल्याने तो एका भिंतीवर जाऊन आदळला यात त्याला गंभीर दुखापत झाल्याने तो मृत्यूमुखी पडला. याची माहिती वन विभागाला मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन काळवीटला गोंदिया येथील पशुसंवर्धन रुग्णालयात नेले. लॉकडाऊनमुळे रस्त्यावर मानवी वर्दळ कमी झाल्यामुळे हे काळवीट शहराच्या दिशेने आल्याचा कयास वन्यजीव प्रेमी लावत आहे.