
काटोल येथील नाभिक एकता मंचची मागणी
विदर्भ वतन / काटोल : कोविड-१९ ची रोकथाम करण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे नाभिक व्यावसायीकांवर आता उपासमारिची वेळ येऊन ठेपली आहे. नाभिक समाज अनादी काळापासून शरीर सेवेतील केशरचनेचे काम करित आलेला आहे. यातुन होणार्या तुटपूंज्या मिळकतीतून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह तसेच दुकानाचे भाडे देवून आपल्या जीवनाचा मार्गक्रम करीत आलेला आहे. लॉकडाऊनमुळे या व्यावसायीकांचे कंबरडे मोडले असून सध्या आणि भविष्यात उद्भवणार्या परिस्थितीवर मात कशी करायची या विवंचनेतुन सध्या हा नाभिक व्यावसायीक जात आहे. याच सोबत शासनाने सुध्दा प्रत्येक वेळी या समाजाच्या उध्दारासाठी काही पावले उचललेली नाहीत. एकंदरीत सामोर आलेल्या परिस्थीतीला तोंड देण्यासाठी शासनाने नाभिक व्यवसायातील कारागीराला प्रतिमहिना ५ हजार रूपये द्यावे, घर भाडे आणि दुकान भाड्यापुरते हक्क रकमी अनुदान म्हणून २५ हजार रूपये द्यावे तसेच तीन महिन्याचे वीज बील माफ करावे अशा मागण्या काटोल येथील नाभिक एकता मंचने मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचेकडे केली आहे. सर्व बाबीं नजरेपूढे ठेवून नाभिक महिला एकता मंचच्या जिल्हाध्यक्ष सुनिता खेडकर, जिल्हा उपाध्यक्षा कुंदा वाघमारे, जिल्हा सचिव वंदना क्षीरसागर मंचचे तालुका अध्यक्ष कुणाल बाभुळकर, सचिव सुनील नक्षीने, उपाध्यक्ष बाबाराव वाघमारे, शंकर क्षीरसागर, योगेश कावलकर, गोविंदा क्षीरसागर, सुमित नागपूरकर, अरविंद क्षीरसागर, सुनील फुकटकर अतुल धानोरकर, मुरलीधर मिसळकर, रामभाऊ बोरकर, किशोर सावरकर, विनोद क्षीरसागर तसेच नाभिक महिला एकता मंच, काटोलच्या तालुका अध्यक्षा सरोज नक्षीने, सचिव रूचिका क्षिरसागर, उपाध्यक्षा रश्मी लोणकर, प्रतिभा अतकरे, प्रतिभा शिरूरकर, लता सावरकर, मनिषा दारव्हेकर, पुष्पा सावरकर, पुष्पा ससनकर, सुधा पिंपळकर, रंजना खेळकर आणि छबुताई क्षीरसागर आदींनी केली. सदर मागणीचे निवेदन तहसीलदार अजय चरडे यांचे मार्फत देण्यात आले.

