Home गोंदिया तलाठी मुख्यालयी राहात नसल्याने एसडीओंकडे तक्रार

तलाठी मुख्यालयी राहात नसल्याने एसडीओंकडे तक्रार

221 views
0
शेतकर्यांची वाताहत
संतोष रोकडे
विदर्भ वतन / अर्जुनी-मोर : तालुक्यातील खामखुरा येथील तलाठी गैरहजर राहत असल्याने शेतकर्यांना सातबारा व इतर कागदपत्र मिळण्यासाठी अडचणी जात असून तलाठी पूर्वीपासूनच आठवड्यातून एखादवेळेस कार्यालयात हजर राहतात. त्यांना गरजेच्यावेळी आपल्या मुख्यालयी हजर राहण्याच्या सूचना द्यावा असे निवेदन
राष्ट्रवादी विद्यार्थी कांग्रेस पार्टीच्या वतीने उपविभागीय अधिकार्यांना देण्यात आले.
  या तलाठी कार्यालयात शासकीय लॅपटॉप व इतर यंत्रणा दिसत नसल्याने शंका येते. सातबारा व इतर कागदपत्र शेतकर्यांना वेळेवर मिळत नाही. कोतवाल सातबाराचे कधी वीस रुपये तर कधी मनमर्जीने पैशाची मागणी करतो, त्यामुळे लॉकडाऊनच्या कालात सुद्धा तलाठी मुख्यालयात राहत नाही. सध्या रब्बी हंगामाच्या कामासाठी सातबारा व इतर कागदपत्रांची नितांत गरज असल्याने व तलाठी गैरहजर राहात असल्याने शेतकर्यांना कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे. या प्रकरणाची चौकशी करून कारवाई करण्याची मागणी राष्ट्रवादी विद्यार्थी कांग्रेस पार्टी अर्जुनी-मोरचे तालुकाध्यक्ष निप्पल बरैय्या, सुरेश दुनियादार, चोकोबा नखाते व इतरांनी उपविभागीय अधिकारी व आमदार मनोहर चंद्रिकापुरे यांच्याकडे केली आहे.