
विदर्भ वतन / नागपूर : महाराष्ट्र आणि गोवा येथील कनिष्ठ न्यायालयांमधील न्यायाधीश व वकिलांना न्यायालयात काम करताना काळा गाऊन घालण्याची सक्ती नसल्याचा निर्णय मुख्य न्यायाधीश न्या. दिपंकर दत्ता यांनी घेतला.उच्च न्यायालयाच्या अपिलीय शाखेचे निबंधक दिनेश सुराणा यांनी एक परिपत्रक काढून सर्व प्रधान जिल्हा न्यायाधीशांना कळविले आहे. या निर्णयानुसार कनिष्ठ न्यायालयांमधील न्यायाधीशांनी काळा कोट किंवा काळा गाऊन यापैकी एक परिधान केले तरी चालेल. मात्र, वकिलांना काळा कोट घालावाच लागेल पण त्यावर काळा गाऊन नसला तरी नियम भंग होणार नाही. या परिपत्रकानुसार करण्यात आलेला बदल कायमस्वरूपी नसुन तो पुढील आदेशापर्यंत लागू राहील.

