सारीच्या रूग्णात आणखी पाच जणांची भर

155
एकूण १७ रूग्णांवर उपचार 
विदर्भ वतन / नागपूर : कोरोनाचा प्रकोप वाढत असताना ‘सारी’च्या रूग्णात भर पडत आहे. आज या रूग्णात पाच जणांची भर पडल्याने आता एकूण संख्या १७ झाली आहे. सारीचे रूग्ण कोविड पॉझिटिव्ह आढळत असल्याने आरोग्य यंत्रनेपुढे पेच निर्माण झाला आहे. मागील आठवड्यात पाच रूग्ण पॉझिटिव्ह आले यातील एका रूग्णाचा ११ मे रोजी मृत्यू झाला.
मेडिकलमध्ये ७ ्रमे रोजी पांढराबोडी, शताब्दीनगर व मोमीनपुरा येथील तीन सारीचे रूग्ण कोविड पॉझिटिव्ह निघाले. यात ९ मे रोजी जवाहरनगर येथील पुरूष व पार्वतीनगरमधील २४ वर्षीय युवकाची भर पडली. पैकी पांढराबोडी येथील २९ वर्षीय सारी व कोविड पॉझिटिव्ह आलेल्या रूग्णाचा मृत्यू झाला. या सर्व रूग्णांची प्रकृती स्थिर असून त्यांना कोविड हॉस्पिटलमध्ये सारीच्या वॉर्डात ठेवण्यात आले आहे. सारीचे सर्व रूग्ण नव्या वसाहतींमधून येत असल्याने त्या वसाहतींमधील नागरिकांमध्ये दहशत आहे.