मे मध्ये कोविड रूग्ण संख्या वाढली

192
विदर्भ वतन / नागपूर : मागील दोन महिन्याच्या तुलनेत मे महिन्यात कोरोनाच्या रूग्णसंख्येत प्रचंड वाढ झाल्याचे चित्र आहे. दररोज रूग्णसंख्येत दोन हजारापर्यंत वाढ होतांना दिसून येत आहे. पैकी एकट्या मुंबईत १५ हजारापेक्षा जास्त कोविड रूग्ण आढळले आहेत. महाराष्ट्र वगळता इतर कोणत्याही राज्यात एवढ्या मोठ्या प्रमाणात रूग्णसंख्या आढळली नाही. तिसर्यांदा लॉकडाऊन करूनही रूग्ण संख्या आटोक्यात आणता आली नाही. त्यामुळे राज्य आणि केंद्र शासनापुढे एक आव्हान ठरत आहे.
मे च्या सुरूवातीला २३८४ रूग्णांची नोंद करण्यात आली त्यानंतर प्रत्येक दिवशी तीन हजाराच्या पुढेच रूग्ण आढळत आहेत. देशात गुजरातमध्ये मृत्यूदर अधिक आहे. त्यामुळे राज्य सरकारच्या प्रयत्नांना यश येतांना दिसत नाही. बरे होणाचे प्रमाण ३१.७ टक्के इतके असून देशभरात मृत्यूदर ३.२ टक्के आहे. देशात ४६ हजार रूग्णांवर उपचार सुरू आहे. पैकी २२,४५४ हजार रूग्ण बरे होऊन घरी परतले. आतापर्यंत देशात २२९३ जणांचा मृत्यू झाला.