संसर्ग टाळण्यासाठी निर्जंतुकीकरण यंत्राचा शोध

233
फार्मसी महाविद्यालयातील प्राध्यापकांना यश
विदर्भ वतन / नागपूर : जग कोरोनाच्या विळख्यात आहे. या विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊन करावा लागला. या परिस्थितील या रोगाच्या विषाणूपासून बचाव कसा करता येईल, रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपाययोजना म्हणून वापरण्यात येणार्या साधनांना निर्जंतुकीकरण कसे करता येईल याकरीता श्री सदाशिवराव पाटील शिक्षण संस्था, कामठी व्दारा संचालित श्रीमती किशोरीताई भोयर कॉलेज आॅफ फार्मसी, कामठी येथील प्राध्यापक संशोधकांकडून नुकतेच दोन पेटेंट दाखल करण्यात आले आहे. नागपूर विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने नागपूर विद्यापीठाच्या भौतिकशास्त्र विभागाचे डॉ. संजय ढोबळे, श्रीमती किशोरीताई भोयर कॉलेज आॅफ फार्मसी कामठी या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मिलींद उमेकर, प्रा. डॉ. कमलेश वाढेर आणि सहायक प्राध्यापीका नेहा राऊत यांनी हे संशोधन लावले.
शोधक प्राध्यापकांनी पडगीलवार अ‍ॅग्रो इंडस्ट्रीजचे तुषार पडगीलवार यांच्या सहकार्याने डिझाईन करण्यात येत आहे. दाखल करण्यात आलेले पेटेंट संपूर्ण जगातील आरोग्य सेवा, व्यावसायिककांना, रूग्णालयात आणि मोठ्या प्रमाणात कोविड-१९ ला लढण्यासाठी मदत करेल असे प्राचार्य डॉ. मिलींद उमेकर म्हणाले.