यंदा मान्सून ९ जूनला धडकण्याची शक्यता

215
श्रीकांत सूर्यवंशी
विदर्भ वतन / नागपूर : भारतीय हवामान विभागाने जाहीर केलेल्या माहितीनुसार यंदा राज्यात ९ जूनला मान्सून कोसळेल असा अंदाज व्यक्त आहे. नैऋत्य मोसमी वार्यासोबत येणारा मान्सूनचा पाऊस येत्या शनिवारपर्यंत अंदमानात दाखल होईल. सिंधुदुर्गसह कोकणात ७ जूनला म्हणजेच ४८ तासात पोहोचेल आणि याच सोबत महाराष्ट्रात पावसाळा सुरू होईल.
मान्सूनचा दुसरा अंदाज आयएमडीनेही प्रसिध्द केला, त्यानुसार १ जूनला मान्सून केरळात पोहोचेल. त्यानंतर थोडा विलंब होईल जूनच्या दुसर्या आठवड्यात मान्सून महाराष्ट्रात दाखल होईल. संपूर्ण महाराष्ट्र मान्सूनने व्यापण्यासाठी जूनचा तिसरा आठवडा लागू शकतो. तिरूवअनंतपूरम, केरळ येथे १ जूनला मान्सूनचे आगमन होईल तर पणजी गोवा येथे ७ जून, कोल्हापूर ९, सातारा १०, पुणे ९, मुंबई ११, नगर १२, जळगावला १८ ला तर नागपुरात १५ जूनला आगमन होईल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला. या अंदाजासोबतच परतीच्या पावसाचा देखील अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. त्यानुसार महाराष्ट्रातून १५ आॅक्टोबरच्या सुमारास मान्सून परतणार, पुण्यातून ११ आॅक्टोबरला , मुंबई ८ आॅक्टोबर, कोल्हापुर ११ ला तर नागपुरातून ६ आॅक्टोबरदरम्यान मान्सून काढता पाय घेण्याची शक्यता आयएमडीच्या अंदाजातुन व्यक्त करण्यात आली.