शहरात कोरोनाचा चौथा बळी

336
विदर्भ वतन / नागपूर : सोमवारी एका २९ वर्षीय युवकाचा कोरोनामुळे मृत्यू झाला. शहरात मृताची संख्या आता चारवर पोहचली आहे. पांढराबोडी येथील हा रूग्ण तीव्र श्वसनाच्या विकारामुळे म्हणजेच ‘सारी’मुळे मेडिकलमध्ये भरती झाला होता. त्याला दारूचे व्यसन होते. रूग्णाची कोविड चाचणी केली असता ७ मे रोजी आलेल्या अहवालात तो पॉझिटिव्ह निघाला. या रूग्णासोबतच शताब्दीनगर आणि मोमीनपुरा येथील सारीचा रूग्णही पॉझिटिव्ह होता. या तिघांवरही मेडिकलमध्ये उपचार सुरू असताना पांढराबोडी येथील रूग्णांचा मृत्यू झाला.
आता शहरात कोरोनाबाधितांची संख्या ३०० वर झाली आहे. राज्यासह नागपूरातही कोरोबाधित रूग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असुन मृतांची संख्या देखील वाढतांना दिसून येत आहे. उपचार घेत आसलेल्या रूग्णांपैकी ९६ रूग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. सोमवारी राज्यात १२३० कोरोना बाधितांची नव्याने भर पडली. याचसोबत राज्यात रूग्णसंख्या २३ हजार ४०३ वर पोहचली. तर दिवसभरात ३६ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला. यात २३ पुरूष व १३ महिलांचा समावेश आहे. देशात  ७१ हजार एकूण रूग्ण आहेत. जगभरातील कोरोबाधितांचा आकडा पाहिल्यास ४३ लाखावर रूग्ण संख्या आहे तर २ लाख ८६ हजारावर मृत्यूमुखी पडले आहेत.