कोरोनाचे संक्रमण रोखण्यासाठी आवश्यक उपाययोजना करा

240

खासदार अशोक नेते यांच्या अधिकार्यांना सूचना
राधाकिसन चुटे
विदर्भ वतन / गोंदिया – गडचिरोली : चिमूर लोकसभा क्षेत्राचे खासदार अशोक नेते यांनी दिनांक ११ मे रोजी आमगाव (जि. गोंदिया) तालुक्याचा दौरा केला. येथील कोरोना संक्रमण रोखण्यासाठी करण्यात आलेल्या उपाययोजनांचा व विविध विकास कामांचा त्यांनी आढावा घेतला.
यावेळी खासदार अशोक नेते यांनी कोरोना या आजारावर मात करण्यासाठी प्रशासनाने सज्ज राहून लॉकडाऊन कालावधीत नियमांची काटेकोरपणे अमलबजावणी व पालन करून परराज्यातून किंवा जिल्ह्याबाहेरून येणार्या नागरिकांची माहिती ठेवून त्यांना गावाबाहेर कॉरंटाईन करून त्यांची आरोग्य तपासणी करण्यात यावी अशी सूचना अधिकार्यांना दिली. या आढावा बैठकीला आमगाव- देवरी विधानसभेचे माजी आमदार केशवराव मानकर, माजी आमदार भेरसिंग नांगपुरे, माजी आमदार संजय पुराम, गडचिरोलीचे जिल्हा महामंत्री डॉ भारत खटी, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख सुरेंद्र नायडू, तालुका महामंत्री राकेश शेंडे, नरेंद्र वाजपेयी, राजू पटले, भाजपचे यशवंत मानकर, भाजयुमोचे प्रदेश सदस्य हितेश डोंगरे, पिंटू अग्रवाल, आमगावचे तहसीलदार डी. एस. भोयर, बीडीओ चंद्रकांत सावळे, ठाणेदार शामराव काळे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. पटले, तालुका कृषी अधिकारी, सार्व. व जिप बांधकाम तसेच सिंचन विभागाचे कार्यकारी, उपअभियंता व इतर विभागाचे अधिकार्यांची उपस्थिती होती.