Home गोंदिया वृक्षांची कत्तल करणार्यावर कुठलीही कारवाई  नाही

वृक्षांची कत्तल करणार्यावर कुठलीही कारवाई  नाही

0
भुवन मेंढे यांचा पत्रपरिषदेत आरोप
राधाकिसन चुटे, जिल्हा प्रतिनिधी गोंदिया  
 विदर्भ वतन / गोंदिया: जिल्ह्यातील सालेकसा तालुक्याच्या गांधीटोला (सालईटोला) येथील शासकीय वनविभागाच्या जागेवर अतिक्रमण करून खाजगी व शासकीय वनविभागाच्या जागेवरील वृक्षांची कत्तल केली जात आहे अशी तक्रार गांधीटोला येथील भुवन मेंढे यांनी सालेकसा पोलीस स्टेशन व वनविभागाकडे केली. मात्र, या विभागाकडून थातूरमातूर चौकशी करून कोणतीही ठोस कारवाई करण्यात आली नाही, असा आरोप भुवन मेंढे यांनी आमगाव येथे घेतलेल्या पत्रपरिषदेत केला.     सालेकसा तालुक्यातील गांधीटोला (सालईटोला) येथील भुवन शंकरराव मेंढे यांची वडिलोपार्जित शेत गट क्रमांक १८५ असून याच शेताला लागून वनविभागाची जमीन गट क्रमांक १८८,१८९,१९१ आहे. भुवन मेंढे यांची शेतात सिंहना, पळस, निंब इत्यादी झाडे लावली आहेत. ४ एप्रिलला भुवन मेंढे यांच्या शेतातील १२ सिंहनाच्या वृक्षांची कत्तल गांधीटोला येथील शामराव पाथोडे व मुलगा पवन पाथोडे, प्रकाश पाथोडे यांनी केले आहे. तर लागून असलेल्या शासकीय जमिनीतील गट क्रमांक १८८,१८९,१९१ या जागेवरील सुध्दा वृक्षांची कत्तल करून लाकड घेऊन गेलेत.
या घटनेची लेखी तक्रार पोलिस स्टेशन, वनपरिक्षेत्र अधिकारी सालेकसा यांना देण्यात आली. याबाबत क्षेत्र सहायक संजय पटले यांनी १७ एप्रिल २०२० ला मौका चौकशी करून कापलेल्या झाडाचा पंचनामा केला. पंचनामा केलेल्या २५ वृक्षांच्या बल्ल्या गैरअर्जदाराच्या घरून जप्त करण्यात आले व काही २० बल्ल्या गैरअर्जदार च्या घरीच सोडून दिल्या.  एवढे पुरावे मिळूनही वनविभाग कारवाई करण्यासाठी टाळाटाळ करत आहे. असा आरोप भुवन मेंढे यांनी पत्र परिषदेत केला आहे. गैर अर्जदारांनी बटईदाराला जीवे मारण्याची धमकी दिली तरी पोलीसांनी गैरर्जदारांवर आजपर्यंत कोणतीही कारवाई केली नाही. गैरअर्जदार यांनी यापूर्वी सुध्दा वनविभागाच्या जमिनीवरील  २०१८ मध्ये गट क्रमांक १९१ मधील ५०० बांबूची अवैध केली आहे व  शासकीय जमिनीवर अतिक्रमण केलेलं आहे तरी सुद्धा वनविभागाचे वन परीक्षेत्राधिकारी अभिजित इलमकर सालेकसा व साकरीटोला वनक्षेत्राचे वनक्षेत्र अधिकारी संजय पटले हे गैरअर्जदारांना शह देत असल्याचा आरोप भुवन मेंढे यांनी केला. या प्रकरणी गैरअर्जदारांवर कारवाई  करण्यात आली नाही तर आपण वनविभाग कार्यालयासमोर उपोषणाला बसू असा इशारा दिला भुवन मेंढे यांनी दिला .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here