Home नागपूर लॉकडाऊनमुळे नाभिक व्यावसायीकांवर उपासमार

लॉकडाऊनमुळे नाभिक व्यावसायीकांवर उपासमार

100 views
0

विदर्भ वतन / वरूड : कोविड-१९ आळा घालण्यासाठी जवळपास २२ मार्चपासून लॉकडाऊन सुरू करण्यात आले. हातावर पोट असलेल्या नाभिक व्यावसायीकांवर दुकाने बंद असल्यामुळे उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे वरूड परिसरातील नाभिक व्यावसायीकांनी काही वेळेकरिता दुकाने सुरू करू देण्याची मागणी वरूड नगर परिषदेचे मुख्य अधिकार्यांना केली. नाभिक दुकानदार संघटनेची बहुउद्देशिय संस्थेचे अध्यक्ष रामकृष्ण शिरूळकर यांनी निवेदन देऊन आपल्या व्यथा मांडल्या. व्यवसाय बंद असल्यामुळे कुठल्याच प्रकारे आर्थिक उत्पन्नाचे साधन नाही. शिवाय शासनाकडून मिळणारी मदत सुध्दा अपुरी पडत आहे, त्यामुळे कुटुंबाच्या उदरनिर्वाहाकरिता मोठे संकट निर्माण झाले असल्याच्या व्यथा शासनाकडे मांडण्यात आल्या. प्रविण सतनकर, रमेश आसोलकर, राजेश मिसळकर, किशोर भगत, राजीव बाभुळकर, अक्षय डांगोरकर आदींची उपस्थिती होती.