Home चंद्रपूर लॉकडाऊनमुळे केशकर्तन व्यावसायिकांवर उपासमारी

लॉकडाऊनमुळे केशकर्तन व्यावसायिकांवर उपासमारी

115 views
0
 शासनाकडे केली आर्थिक मदतीची मागणी
विदर्भ वतन / वरोरा : मार्च महिन्यापासून देशावर कोरोनाचं वादळ घोंगावत आहे. त्यामुळे शासनानी १७ मेपर्यंत लॉकडाऊन घोषित केले. या लॉकडाऊनचा फटका सलून व्यावसायीकांना बसला आहे. लॉकडाऊनमुळे पूर्णत: केशकर्तनाचा व्यवसाय बंद पडला आहे. त्यामुळे आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करायचा हा प्रश्न नाभिक समाजापुढे उभा आहे.
या परिस्थितीची जाण ठेवून महाराष्ट्र शासनाने सलून व्यावसायिकांना पॅकेज घोषित करावे, अशी मागणी वरोरा तालुका नाभिक समाज सलुन असोसिएशनच्या वतीने करण्यात आली. या मागणीच्या आशयाचे निवेदन लोकप्रतिनिधींना सादर करण्यात आहे. नाभिक समाजाचा मुख्य व्यवसाय केशकर्तन करणे हा आहे. अनेकांनी फुटपाथवर, किरायाने दुकाने घेऊन हा व्यवसाय सुरू केला. यात अनेक कारागीरसुद्धा काम करतात. पण लॉकडाऊनमुळे हा व्यवसाय ठप्प पडला आहे. परिणाामी अनेकांचे संसार उघड्यावर आले आहे. कर्नाटक सरकारने आपल्या राज्यातील सलून व्यावसायिकांना पाच हजार रूपयाचे पॅकेज घोषित केले आहे. अशाच स्वरूपाचे महाराष्ट्र सरकारनी पॅकेज सलून व्यावसायिक आणि कारागीरांना द्यावे अशी मागणी करण्यात आली.
दुकानेच बंद असल्यामुळे काम नाही आणि काम नाही तर पैसे नाही त्यामुळे गेल्या दोन महिण्यापासून आमच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. घराचे भाडे, दुकान किराया, विज बिलाचा भरणा या विवंचनेत नाभिक समाज सापडला आहे.
यवतमाळ जिल्हा आॅरेंज झोनमध्ये आहे. महाराष्ट्र सरकारने केशकर्तन व्यवसायाला हिरवी झेंडी दाखविली आहे. पण जिल्ह्यापातळीवर अद्यापही परवानगी देण्यात आली  नाही. त्यामुळे या निर्णयावर संभ्रम पसरला आहे यावर त्वरीत तोडगा काढावा अशी मागणी वरोरा तालुका नाभिक समाज सलुन असोसिएशनच्या वतीने कार्तिक वाटकर, चिंतामणी मांडवकर, नाना कडुकर, उध्दव पुंड, होमराज घुमे यांनी चंद्रपूरचे खासदार बाळुभाऊ धानोरकर तसेच वरोरा विधानसभा क्षेत्राच्या आमदार प्रतिभा धानोरकर यांना निवेदन देण्यात आले. संदिप शेंडे, पंकज बन्सोड, स्वप्निल चौधरी, तुषार चौधरी, अंकित चौधरी, राहुल कडुकर, सुमित बन्सोड, प्रेम पानबुडे, किशोर फुलभोगे आदींची उपस्थिती होती.