Home नागपूर महामार्गाची कामे पूर्ण करण्याचे वि.स. अध्यक्ष पटोले यांचे निर्देश

महामार्गाची कामे पूर्ण करण्याचे वि.स. अध्यक्ष पटोले यांचे निर्देश

54 views
0
मुख्यमंत्री सहायता निधिचाही घेतला आढावा
विदर्भ वतन / नागपूर : राज्यातील गरजु लोकांना मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीद्वारे मदत केली जाते, ही मदत नागपूर विभागात कशी सुरू आहे, गरजु लोकांना त्याचा लाभ कसा मिळतो तसेच नागपूर विभागाअंतर्गत येणार्या राष्ट्रीय महामार्गाचे काम कसे सुरु आहे याबाबतची आढावा बैठक महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष नानाभाऊ पटोले यांनी नुकतीच घेतली.
निराधार किंवा अर्ज केलेल्या लोकांना मुख्यमंत्री सहायता निधीचा लाभ योग्य पद्धतीने मिळावा तसेच राष्ट्रीय महामार्गाची प्रलंबित कामे योग्य पद्धतीने व तातडीने पूर्ण व्हावीत यासंबंधी त्यांनी संबंधीत अधिकार्यांना आदेश दिले. मुख्यमंत्री सचिवालय, हैदराबाद हाऊस नागपूर येथे ही आढावा बैठक पार पडली.  या बैठकीला राष्ट्रीय महामार्गाचे नागपूर विभागीय कार्यकारी अभियंता नरेश बोरकर तसेच मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीचे कक्ष प्रमुख तथा सदस्य सचिव डॉ. के. आर. सोनपुरे यांची प्रमुख्याने उपस्थित होते.