नाभिक एकता मंचाची मागणी
विदर्भ वतन न्युज पोर्टल / नागपूर : कोरोना महामारीमुळे नाभिक सलुन बांधवांवर गंभीर संकट ओढवल्याने सलुन बांधवांना सुरक्षा कवच (जीवन विमा) व तीन महिन्याचे सलुन दुकानाचे इलेक्ट्रीक बिल माफ करावे अशी मागणी नाभिक एकता मंच दुकानदार संघाचे अध्यक्ष नरेश लक्षणे व नाभिक एकता मंच नागपूर ग्रामीणचे अध्यक्ष शरद वाटकर यांनी निवेदनाव्दारे ना. सुनिल केदार यांचेकडे केली. नाभिक एकता मंच केंद्रीय सलुन दुकानदार संघाचे अध्यक्ष नरेश लक्षणे, नाभिक एकता मंच नागपूर ग्रामीण जिल्ह्याचे अध्यक्ष शरद वाटकर, नाभिक एकता मंच केंद्रीय सलुन दुकानदार संघाचे सचिव प्रशांत चौधरी, नाभिक एकता मंच नागपूर शहर सलुन दुकानदार संघाचे अध्यक्ष दिलीप लक्षणे, नाभिक एकता मंच पारशिवनी तालुका अध्यक्ष सुनील लक्षणे, नाभिक एकता मंच पारशिवनी तालुका सचिव आकाश पंडितकर, नाभिक एकता मंच पूर्व नागपूर शहरचे मार्गदर्शक घुमे काकाजी यांच्या प्रमुख उपस्थितीत ना. केदार यांना निवेदन देण्यात आले.

