शहरात कोरोनाचा तिसरा बळी, पार्वतीनगरातील मृत युवक कोरोना संक्रमित

224

विदर्भ वतन / नागपूर : शहरात कोरोना पॉझिटीव्ह रूग्णांची संख्या वाढत चालली असतांनाच उपचारानंतर बरे झालेल्या रूग्णांमध्येही वाढ झाली असतांनाच दक्षिण नागपूरातील रामेश्वरी रोड परिसरातील पार्वतीनगर येथील एका २२ वर्षीय तरूणाचा बळी गेल्याने शहराला हादरा बसला. गत काही दिवसांपासुन त्याची प्रकृती खालावल्याने त्याचेवर औषधोपचार सुरू होते. मात्र आज बुधवारी त्याचा कोरोना अहवाल पाँझिटीव्ह आल्याने परिसरातील नागरिकांमध्ये दहशत निर्माण झाली आहे़ या घटनेला अजनी पोलिस स्टेशनच्या पोलिस निरीक्षकांनी दुजोरा दिला आहे. तो काल दिनांक ५ रोजी मृत झाल्यानंतर आज त्याची रिपोर्ट कोरोना पॉझिटीव्ह आल्याने तो कोणाकोणाच्या संपर्कात आला हे शोधने पोलिस प्रशासनापुढे आव्हान ठरणार आहे. याच सोबत सतरंजीपुरासारखाच हा परिसर देखील सील करण्याच्या दिशेने प्रशासनाने काय पाऊल उचलणार याकडे सर्वांचे लक्ष आहे. शहरात एकुण १७० रूग्ण पॉझिटीव्ह आहेत.