तुलाराम कावळे यांचे निधन 

225
आमगांव: रिसामा येथील सामाजिक कार्यकर्ते व माजी शिक्षण विस्तार अधिकारी तुलाराम कान्हूजी कावळे यांचे आज कर्करोगाने निधन झाले. ते ७८ वर्षांचे होते. गोंदिया रोडवरील शिव मोक्षधाम येथे त्यांच्या पार्थीवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांचे पश्चात ३ मुले व बराच मोठा आप्तपरिवार आहे.
 त्यांना शिक्षक या पदावरुन शिक्षण विस्तार अधिकारी म्हणून बढती मिळाली होती. त्यांनी रिसामा येथे राधाकृष्ण मंदिर व शिव मंदिराची स्थापना केली. सोबतच अनेक सामाजिक कार्यात त्यांचा सहभाग होता. ते कलार समाजाचे प्रतिनिधित्व करीत असत.