अज्ञात वाहनाच्या धडकेत दोन भाऊ जागीच ठार

295

राहुल चुटे
विदर्भ वतन / आमगाव: दुचाकीवरून जात असताना अज्ञात वाहनाने धडक दिल्याने दोघा भावांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना आमगाव नगरपरिषद अंतर्गत येणार्या किंडगीपार येथील डोये वाड्यासामोर घडली. नारायण शामलाल अग्रवाल (४७) आणि दीपक शामलाल अग्रवाल (३५) अशी मृत भावांची नावे आहेत. नटराज मार्गावरील हे व्यावसायीक बंधू रात्री ८ वाजताच्या सुमारास आमगाव-गोंदिया मार्गावरील किडंगीपार येथील वळण रस्त्यावर हा अपघात झाला. घटनेची माहिती मिळताच आमगावात शोककळा पसरली. पोलिसांनी घटनेची नोंद घेऊन पुढील कारवाई केली. पुढील तपास पोलीस निरीक्षक शामराव काळे करीत आहेत.