नागपूर टेंट हाऊसचे मदतीसाठी शासनाला निवेदन

236
विदर्भ वतन / नागपूर : कोरोनामुळे उध्द्ववलेल्या लॉकडाऊनमुळे सर्व जग आर्थिक संकटात सापडले आहे. त्यामध्ये ऐन सिजनवर टेंट हाऊसचा व्यवसाय बंद पडल्यामुळे या व्यावसायीकांवर उपासमारीची वेळ आली आहे. 
शहरात जवळपासव ७ ते ८ हजार टेंट हाऊसचा व्यवसाय करणारे लोक आहेत. या व्यवसायात एक ते दिड लाख कामगार काम करतात. लॉकडाऊनमुळे सार्वजनिक समारंभ आयोजित करणे बंद असल्यामुळे या कामगारांवर देखील संकट कोसळले आहे.  फेब्रुवारी ते जून पर्यंत महत्चाचा व्यावसायीक सीजन असतो. या चारच महिन्यात होणार्या उत्पन्नातून आमचा वर्षभराचा सर्व खर्च भागवतो आणि स्थायी कामगारांचे पगार यातूनच वर्षभर पुरवत असतो असे नागपूर टेंट हाऊसचे अध्यक्ष सुनील राऊत यांनी सांगीतले.
मागील मार्च महिन्यांपासून तर जून महिन्यांपर्यंत झालेल्या सर्व बुकींग या लॉकडाऊनमुळे तसेच लग्नासाठी जे मार्गदर्शक तत्व ठरवून देण्यात आलेले आहे, त्यामुळे आमच्या सर्व बुकींग रद्द करण्यात आल्या आहेत. बुकींग करणारे आमचे सर्व ग्राहक आमच्याकडे आपली बुकींगची रक्कम परत करण्यासाठी सारखा तगादा लावत आहेत. तसेच फोन करून आम्हाला धमकीसुध्दा देत आहेत. या व्यवसायात आमचे जे स्थायी कामगार आहेत त्यांना आम्हाला पगार द्यावा लागतो. तसेच इलेक्ट्रीक बिल, पाण्याचे बील हा सर्व सामानाचा घसारा व सर्व खर्च लागून आतापर्यंत आलेल्या बुकिंगमधून खर्च करण्यात आले आहे, त्यामुळे आम्ही ग्राहकांना कार्यालयीन खर्च ४० टक्के रक्कम कापून फक्त ६० टक्के रक्कम परत करण्यास तयार आहोत. या व्यवसायात जूनपर्यंत लॉकडाऊन करण्याचे संकेत मिळत आहेत. त्यामुळे आमचा सिझन आता दिवाळीनंतरच सुरू होईल.  यावर्षीचा पूर्ण सिझन आमच्या हातून गेल्याची व्यथा त्यांनी विदर्भ वतनकडे मांडली. यावर शासनाने तोडगा काढून आर्थीक मदत द्यावी अशी मागणी नागपूर टेंटने केली.